रेल्वे मधे नौकरी लावुन देतो म्हणत लाखो रुपयाने गंडवणारे भामटे पोलीसांच्या जाळ्यात
(योगेश शर्मा)
बुलढाणा (आरएनआई) सुशिक्षित बेरोजगारी वाढल्याने बेरोजगार युवक नौकरी लावुन देतो असे कुणी म्हंटले तर त्यांच्या भुलथापांना बळी पडत आहेत. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. दिलेले नियुक्ती पत्र बनावट असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झालेल्या युवकांच्या फिर्यादीवरून दि. ७ आक्टोबंरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे मधे नौकरी लावुन देतो म्हणत लाखो रुपयाने गंडवणारे तिन भामटे पोलीसांनी जेरबंद केले आहे।
बनावट कागदपत्रे देऊन नॉर्दनरेल्वेचे रेल्वे टिसी खोटे नियुक्ती पत्र तसेच भारतीय रेल्वेचे अनॉउंसर एंड इंडीकेटर ऑपरेटरच ओळखपत्र देवून फसविणाऱ्या आरोपी विरुध्द लेखी तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील फिर्यादी नामे सुधीर जगदेव अंभोरे वय २७ वर्ष रा एकलारा ह.मु चिखली जि. बुलडाणा यांनी आरोपी संजय विठोबा खाटोकर वय ४० वर्ष रा सावरखेड नागरे ता देउळगावराजा जि. बुलडाणा, प्रियेश हरेश्वर जाधव वय ३० वर्ष रा बेलवली बदलापुर प. जि ठाणे, अशोक पंजाबराव वाळके वय ४२ वर्ष रा. जनता कॉलनी सीपना कॉलेज रोड अमरावती, राकेश पाटील रा सुरत यांनी फिर्यादी यांना रेल्वे मध्ये नोकरी लावुन देतो असे म्हणुन फिर्यादी कडुन ७ लाख रुपये तसेच रवी गाडेकर यांचे कडुन २ लाख रुपयाची फसवणुक करून व बनावट कागदपत्रे फिर्यादीला नॉर्दनरेल्वेचे रेल्वे टिसी खोटे नियुक्ती पत्र तसेच भारतीय रेल्वेचे अनॉउंसर एंड इंडीकेटर ऑपरेटरच ओळखपत्र देवून फसविणाऱ्या आरोपी विरुध्द फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता।
सदर गुन्हयाचे संबंधाने पो.नि.संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे सपोनी नरेंद्र पेंदोर यांना गुन्हयासंदर्भाने आरोपीचा शोध लावणेकामी सुचना दिल्या असता सपोनी नरेंद्र पेंदोर डि. बी. पथकाचे पोलीस नाईक अमोल गवई, पोकों राजेश मापारी यांनी गुन्हयातील आरोपी संजय विठोबा खाटोकर यांचा शोध घेतला असता तो देउळगावराजा येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. याची खबर आरोपीला लागली त्यामुळे तो फरार होण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफीने ताब्यात घेवुन दि १६ फेब्रुवारी २४ रोजी अटक करण्यात आली असुन आरोपी अशोक पंजाबराव वाळके हा अमरावती येथुन संभाजीनगर येथे जात असल्याची गोपणीय माहिती मिळाल्यावुन चिखली येथे नाकाबंदी करुन त्याचा ताब्यात घेवुन आरोपी यास दि.२० फेब्रुवारी २४ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी प्रियेश हरेश्वर जाधव यास पोहेकॉ विजय गिते सोबत अजय इटावा पो स्टे चिखली यांनी महानगर न्यायदंडाधिकारी ३५ अन्वये न्यायालय, सीएसएमटी मुबई यांचे आदेशाने पोलीस स्टेशन चिखली येथील नमुद गुन्हयात ट्रान्सफर कारवाई करुन अधिक्षक मध्यवर्ती कारागृह भायखळा मुंबई जेल मधुन ताब्यात घेत चिखली येथे आणून दि. २२ फेब्रुवारी ला सदर गुन्हायात अटक केली आहे. असुन वरील तिनही आरोपी पीसीआर मध्ये असून पढील तपास सपोनी नरेंद्र पेंदोर व पोकों तुकाराम मोरे करीत आहे।
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक बि.बि महामुणी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.संग्राम पाटील, सपोनी नरेंद्र पेंदोर, पोहेकों विजय गिते, पोना अमोल गवई, पोकों राजेश मापारी, पोकों तुकाराम मोरे, पोकों पंढरीनाथ मिसाळ, पोकों अजय इटावा पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.
Follow the RNI News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6XB2Xp81Z
What's Your Reaction?