भक्ती महामार्गासाठी शेतक-यांच्या जमीनी अधिग्रहीत करून शेतक-यांना भुमीहीन करू नये, भक्ती महामार्गास स्थगिती दयावी, पांढरदेव येथील शेतक-यांचे मुख्यमंत्री यांना साकडे
(योगेश शर्मा)
बुलढाणा (आरएनआई) बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा ते शेगांव पर्यंत नव्याने होवु घातलेल्या भक्ती माहामार्गाच्या निर्मीती करीता शेतक-यांच्या पिकाऊ शेत जमीनी अधिग्रहीत करण्याची अधिसुचना काढण्यात आली आहे. या काढण्यात आलेल्या अधिसुचनेमुळे निर्माण होणा-या या मार्गावरील चिखली तालुक्यातील ग्राम पांढरदेव शिवारातील शेतक-यांत भितीचे वातावरण निर्मीती झाली आहे. पांढरदेव शिवारातील ४० ते ५० विविध गटातील असंख्य शेतक-यांच्या पिकाऊ काळया कसदार जमीनी अधिग्रहीत केल्या जाणार आहे. या भक्ती महामार्गाच्या निर्मीती करीता शासनाने जमीनी अधिग्रहीत केल्यास शेतक-यांच्या कुटूंबियांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होवुन परिसरातील शेतकरी वर्ग अत्यंत दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. सदर पिकाऊ जमीनी या मार्गाच्या निर्मीती करीता घेण्यास शेतक-यांनी विरोध दर्शवीत भक्ती मार्गास स्थगिती दयावी अशा स्वरूपाचे निवेदन चिखली तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले असुन वेळप्रसंगी आंदोलन करणार असल्याचा ईशाराही शेतक-यांच्या वतीने देण्यात आला आहे।
तहसिलदार चिखली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंदखेड राजा ते शेगांव या तिर्थस्थळी जाणा-या भाविकांकरीता अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. तसेच सदर नव्याने होणा-या भक्ती महामार्गाच्या निर्मीतीकरीता जिल्हयातुन कोणीही मागणी केलेली नसुन केवळ राज्याच्या इतर ठिकाणावरून शेगांवला जाणा-या प्रवाशांच्या प्रवासातील काही मिनटे वाचविण्याकरीता पांढरदेव शिवारातील शेकडो शेतक-यांवर संभाव्य उपासमारी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शेतक-यांच्या काळया आईला हिस्कावुन घेतल्याने पुढील पिढीच्या भवितव्यावर गंडातर आणु नये असेही म्हटले आहे. याचबरोबर सद्यस्थितीत या परिसरातील शेतकरी अत्यंत दहशतीच्या वातावरणात वावरत असुन अनेकांनी तर अन्न पाणी सुध्दा त्यागले आहे। शेगांव ला जाण्याकरीता जिल्हयातील इतर मार्गा बरोबरच शेगांव पर्यत रेल्वे मार्गही उपलब्ध आहे। असे असतांना उपरोक्त शेतक-यांवर ओढावलेल्या परिस्थतीचा सहानुभूतीपुरक विचार करून शासनाने या भक्ती महामार्गाच्या निर्मीतीस स्थगिती दयावी व शेतक-यांना भुमीहीन करू नये असेही या निवेदनात नमुद केले असुन वेळप्रसंगी न्याय हक्काकरीता शेतक-यांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असा ईशाराही राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे।
तहसिलदार चिखली यांना आज दिनांक २९ फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच चेतन म्हस्के, भारत म्हस्के, शिवनारायण म्हस्के, शरद म्हस्के, पुरूषोत्तम वाकोडे, समाधान म्हस्के, हर्षल म्हस्के, अन्ना आंभोरे, अनिकेत म्हस्के, शेषराव म्हस्के, राजु साळवे, सुधाकर म्हस्के, शिवाजी म्हस्के, शिवाजी कुटे, अशोक उगले, दामोधर काकडे, कुशिवर्ता म्हस्के, सोहन म्हस्के, विलास म्हस्के, राम म्हस्के, धनंजय म्हस्के, गजानन म्हस्के, रामदास काकफळे यांच्यासह असंख्य शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत।
Follow the RNI News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6XB2Xp81Z
What's Your Reaction?