गोहत्या बंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार : शेखर मुंदडा
राज्यभर गो रक्षा साठी स्पेशल स्कॉड ची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील, चिखली येथे महा एनजीओ फेडरेशन च्या आढावा बैठकीत गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची उपस्थिती। (योगेश शर्मा)

बुलढाणा (आरएनआई) गोहत्या बंदीचा कायदा आला त्यात समाधानी आहे. परंतु त्याची हवी तशी अंमलबजावणी होत नसल्याने असमाधानी आहे. आता गोसेवा आयोग झालेला आहे, आता पूर्ण अंमलबजावणी होईल. आयोग झाल्यावर धाराशिव मधील २ तर पुण्यातील १ कत्तलखाना पूर्ण नेस्तनाबूत करण्यात आले असून यापुढे आता जर कुठल्याही कत्तलखान्यात गाय कापली असे समोर आले तर त्यांनी लक्षात ठेवावे पूर्ण नेस्तनाबूत करून टाकू, जे होईल ते होईल, तो कायदा पूर्ण अमलात येईल, असे वक्तव्य महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक तसेच गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी चिखली येथे माहिती देतांना सांगितले।
आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी महा एनजीओ फेडरेशन ची आढावा बैठक सकाळी ११ वा. स्थानिक अग्रेसन रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीत शेखर मुंदडा, अशोक अग्रवाल सह अनेक अधिकारी, पदाधिकारी, समन्वयक तसेच विविध एनजीओ चे सदस्य, पदाधिकारी हजर होते। "माझे देश माझी जबाबदारी" या उद्देशाने आपण सुरवातीला १०१ एनजीओ ला सोबत घेऊन महा एनजीओ फेडरेशन ची स्थापना केली तर आज यात अडीच हजार पेक्षा जास्त एनजीओ समाविष्ट असून हा आकडा अजून वाढणारच आहे असे मुंदडा यांनी उपस्थितांना सांगितले. तर गोसेवा आयोग बद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गोसेवा आयोग हे भारतातील पहिले असे आयोग आहे ज्यास सीएसआर मंजूर झालेला आहे. एनजीओ चे कार्य करत असतांना पूर्णपणे शासनावर अवलंबून राहायचे नाही, सरकार व्यवस्था बघू शकते, आपल्याला अवस्था बघावी लागेल, असा संदेश यावेळी त्यांनी दिला. ज्या शासकीय योजना एनजीओ साठी असेल ते आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्नीशील राहू. आम्ही सरकारकडे निवेदन करणार आहोत की, एक एनजीओ सेल ची निर्मिती करा. गोसेवा आयोगातही एनजीओ चे महत्व असणार आहे. सध्या भारतातील सात राज्यात गोसेवा आयोग असून यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे काम सर्वात चांगले असल्याचे समाधान वाटते असे मुंदडा यांनी सांगितले।
ते पुढे म्हणाले की, गेल्या सात महिन्यात २२ जिल्ह्याचा प्रवास करून विविध गोशाळेला भेटी दिल्या आहे. काही गोशाळा मध्ये पेपरवर गायी असतात, अनुदान घेतात पण काम काही करत नाही, ते आता बंद होणार असून एकही रुपया वाया जाणार नाही यावर आमचे लक्ष आहे. गोसेवेसाठी जी-९ मिशन ची आम्ही संकल्पना आणली असून ती पूर्णपणे राबविण्यात येईल असे ते म्हणाले।
पुढे मुंदडा यांनी सांगितले की, आम्ही एक टोल फ्री नंबर आणला आहे. कुठलीही गाय कसायाकडे विकण्याआगोदर टोल फ्री नंबरवर संपर्क केल्यास २४ तासाच्या आत शेतकऱ्याला पैसे प्राप्त होतील. आतापर्यंत आम्ही गत ७ महिन्यात जवळपास १६८० गायी पैसे देऊन वाचविल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र भरात आमचे सध्या अडीचशे पेक्षा जास्त दान दाते आहेत।
पुढे मुंदडा यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यात सध्या ६ गोशाळेला अनुदान दिलेले असून अजून दोन गोशाळेला अनुदान देण्यात येईल. तर दुध देत नाही म्हणून देशी गाय सोडु नका, देशी गोवंशाला अजिबात दुधाची गरज नाही. कारण त्यांच्या गोमूत्र आणि शेणामुळे नवीन क्रांती होणार आहे. गोबर गैसचे पुढे सीएनजी बनणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रोजेक्ट हवा, सरकार त्यासाठी चांगली सबसिडी सुद्धा देणार असून या प्रोजेक्ट साठी कमीत कमी २ हजार गायी लागतील. इमोशनल सोबत कमर्शियलचे प्रयत्न हवे असे मुंदडा यांनी सांगितले. प्रत्येक मंदिराने गोशाळेचे निर्माण करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी मुंदडा यांनी केले।
यावेळी गोहत्या बंदी कायद्याबाबत बोलतांना शेखर मुंदडा यांनी सांगितले की, या कायद्याची अंमलबजावणी होणार आणि अशी देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा मनाची इच्छा आहे. म्हणूनच हा कायदा आला परंतु अंमलबजावणी झाली नाही ती आता होणार।
गोरक्षकाबाबत बोलतांना ते म्हणाले की, माझी गोरक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेऊन समस्यांचे निवारण होत नाही. आम्ही एक मॉडेल तयार करीत आहोत, यामध्ये पशू संवर्धन अधिकारी यांना गोहत्येबाबत माहिती द्यावी, ते तात्काळ संबंधित पोलीसांना ती माहिती देतील आणि कारवाई होईलच. कारण लक्षात घेण्यासारखे आहे की, एक शासकीय अधिकारी जेव्हा दुसऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना सांगतो तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते, आणि हे प्रयत्न यशस्वी होत आहे. कधी कधी गो रक्षकांकडून भावनेच्या भरात पाऊल उचलल्या जाते आणि मंग त्यांच्यावरच उलट कारवाई होते, असे जरी झाले तरी आयोग त्यांच्या पाठीशी असणार आहे असे मुंदडा यांनी हितवाद ला सांगितले।
त्यांनी पुढे सांगताना धुळे येथील पोलीस अधीक्षकांबाबत सांगितले की, त्यांनी गोरक्षा साठी स्पेशल स्कॉड तयार केला असून ही संकल्पना फार छान आहे. ही संकल्पना राज्यभर व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते बोलले. तर मागच्या दहा वर्षांत पशुसंवर्धनाची एकही भर्ती झालेली नाही आणि मागणी मोठी होती. परंतु ८०० लोकांची भर्ती होत आहे। पहिल्या टप्प्यात ३०० लोकांची भर्ती होणार असल्याचेही मुंदडा यांनी यावेळी सांगितले।
Follow the RNI News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6XB2Xp81Z
What's Your Reaction?






